पशुसंवर्धन समितीची कामे
पशुधनाचे आरोग्य व देखभाल
गायी, म्हशी, बकऱ्या, कोंबड्या आदी प्राण्यांच्या आरोग्य तपासण्या करणे.
पशूंना लसीकरण करून रोगप्रतिबंधक उपाययोजना राबवणे.
जनावरांवर उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांवर नियंत्रण ठेवणे.
दुग्धोत्पादन व विकास
गावात दुध संकलन केंद्र स्थापन करण्यास मदत करणे.
शेतकऱ्यांना जास्त उत्पादनक्षम व दर्जेदार जनावरे घेण्यासाठी प्रोत्साहन देणे.
दुग्धव्यवसायाशी संबंधित प्रशिक्षण, मार्गदर्शन करणे.
पशुखाद्य व चारापिके
शेतकऱ्यांना हिरवा व सुका चारा उत्पादनासाठी मार्गदर्शन करणे.
पशुखाद्य साठा उपलब्ध करून देण्यासाठी योजना राबवणे.
उत्पन्न वाढविणे
कुक्कुटपालन, शेळीपालन, डुक्करपालन यांसारख्या पूरक व्यवसायांना चालना देणे.
शेतकऱ्यांना पशुपालनाशी संबंधित शासकीय योजना सांगणे व त्यांचा लाभ मिळवून देणे.
प्रशिक्षण व जनजागृती
पशुपालकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे.
ग्रामस्थांना पशुपालनातील स्वच्छता, रोगनियंत्रण आणि देखभाल याबाबत माहिती देणे.
अंमलबजावणी व अहवाल
शासनाकडून मिळणाऱ्या पशुसंवर्धन योजना गावात राबवणे.
खर्च व कामांचा हिशोब ग्रामसभेत सादर करणे.
पशुसंवर्धन समिती पदाधिकारी
- सौ. करीना कल्पेश रक्ते (सरपंच ) – अध्यक्षा
- श्री. दिनेश नथुराम शिगवण ( ग्रामपंचायत अधिकारी ) – सचिव
- श्री. सुरज रघुनाथ पाडावे – सदस्य
- श्री. कल्पेश प्रकाश शिंदे – सदस्य
- श्री. सुरेश भिकू रक्ते – सदस्य
- सौ. सुनिती सुरज महाडिक – सदस्या
- मनाली मिलिंद लोखंडे – सदस्या
- सौ. उज्वला वामन कदम – सदस्या
- सौ. भारती गोविंद रक्ते – सदस्या
- श्री. प्रितम गौतम लोखंडे – सदस्य
- श्री. पर्शुराम धोंडू बैकर – सदस्य
- श्री. भिकू नथू चव्हाण – सदस्य
- श्री. ज्ञानदेव रघुनाथ सोनघरे – सदस्य

