बुरी गाव
बुरी हे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात वसलेले एक प्राचीन व निसर्गरम्य गाव आहे.आणि अडखळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत समाविष्ट आहे. हे गाव सह्याद्रीच्या डोंगररांगा व कोकणच्या हिरव्यागार प्रदेशात वसलेले असल्यामुळे येथील भौगोलिक रचना, हवामान व जीवनपद्धतीवर निसर्गाचा मोठा प्रभाव आहे. वर्षभर आल्हाददायक हवामान असते; पावसाळ्यात मुसळधार पाऊस व हिवाळ्यात थंडावा जाणवतो.
सामाजिक व सांस्कृतिक जीवन
ग्रामदेवतेचे मंदिर आणि हनुमान मंदिर हे देवस्थान या गावाला लाभले आहेत .
वार्षिक जत्रा, गणेशोत्सव, होळी, गुढीपाडवा, नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरे होतात.
लोककला — ढोल, ताशा, हलगी, भजन-कीर्तन, कोळी नृत्य
सध्याची परिस्थिती
मुख्य शेती पीक: भात (धान), नाचणी, वाल, तूर
फळझाडे: आंबा, काजू, नारळ, सुपारी
इतर व्यवसाय: बांधकाम मजुरी, मुंबई-पुणे शहरांमध्ये स्थलांतरित मजूर कामगार
नैसर्गिक साधनसंपत्ती: डोंगररांगा, छोट्या नद्या/ओढे, जंगल, सुपीक माती
२५३ हेक्टर
गावाचे क्षेत्र
४० घर
एकूण घर संख्या
१२९
एकूण लोकसंख्या
६६.९६ %
एकूण साक्षरता

