टाकवली गाव
टाकवली हे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात वसलेले एक प्राचीन व निसर्गरम्य गाव आहे. हे गाव सह्याद्रीच्या डोंगररांगा व कोकणच्या हिरव्यागार प्रदेशात वसलेले असल्यामुळे येथील भौगोलिक रचना, हवामान व जीवनपद्धतीवर निसर्गाचा मोठा प्रभाव आहे.
सामाजिक व सांस्कृतिक जीवन
ग्रामदेवतेचे मंदिर व महादेवाचे पांडवकालीन मंदिर हे या गावाचे प्रसिद्ध आहे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते.
वार्षिक जत्रा, गणेशोत्सव, होळी, गुढीपाडवा, नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरे होतात.
लोककला — ढोल, ताशा, हलगी, भजन-कीर्तन, कोळी नृत्य
सध्याची परिस्थिती
गावात अजूनही सहकार्य व परस्पर मदतीची पारंपरिक संस्कृती टिकून आहे.
तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर शिक्षणासाठी व नोकरीसाठी मुंबई-पुणे किंवा परदेशात स्थलांतर करते.
पर्यटनदृष्ट्या संभाव्यता — शांत वातावरण, निसर्ग सौंदर्य, आणि गावामध्ये असणारे पांडवकालीन शिवमंदिर
३०३.७२ हेक्टर
गावाचे क्षेत्र
१०१ घर
एकूण घर संख्या
३२७
एकूण लोकसंख्या
६९.७५ %
एकूण साक्षरता

